शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2020 (08:08 IST)

आता बोला, कोरोनावर २०२१ पूर्वी लस नाही

कोविड १९ वर एकूण ११ प्रायोगिक लशींवर सध्या जगात चाचण्या सुरू आहेत. त्यात भारतातील कोव्हॅक्सीन व झायकोव्ह डी या लशींचा समावेश आहे. पण, यातील कुठलीही लस २०२१ पूर्वी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे.
 
आयसीएमआरने (भारतीय वैद्यक संशोधन परिषद) मात्र शुक्रवारी असे म्हटले होते की, पंधरा ऑगस्ट रोजी करोनावरची स्वदेशी लस जारी केली जाईल. आयसीएमआरच्या त्या घोषणेवर टीकेची झोड उठल्यानंतर लशीच्या चाचण्यांत स्वयंसेवक ठरवणे व इतर प्रक्रियातील लालफितीचा कारभार टाळण्यासाठी रुग्णालये, कंपन्या व इतर संबंधित घटकांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती, असे स्पष्टीकरण या संस्थेने केले होते. असे असले तरी पंधरा ऑगस्टला स्वदेशी लस आणली जाईल या घोषणेवर त्यांनी स्पष्टपणे माघार घेतली नव्हती, पण रविवारी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने मात्र अशी लस निदान या वर्षी तरी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
पंतप्रधान मोदी यांना विरोधकांवर राजकीय मात करण्याकरिता पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधून करोना लस जारी करता यावी यासाठी हा खटाटोप असल्याची टीका वैद्यकीय तज्ज्ञांनी केली होती. बिहारमध्ये यावर्षी निवडणुका आहेत त्यामुळेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली होती.