शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लॉकडाऊनमुळे महसूल तोटा झाला आहे, शिवाय सरकारचा खर्चही वाढला आहे. या परिस्थितीचा परिणाम सरकारच्या नव्या योजनांवर होऊ लागला आहे. मंदावलेल्या अर्थव्यस्थेचा विचार करता केंद्र सरकारने नव्या योजना स्थगित केल्या आहेत. वित्त मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका असा निर्देश दिला आहे.
 
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना स्थगित केलेल्या नाही आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार यावर्षी कोणत्याही सरकारी योजनेस मान्यता दिली जाणार नाही. यापूर्वी मंजूर झालेल्या नवीन योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. आत्मनिर्भर भारत आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना देण्यात आली आहे. या आदेशात म्हटलं आहे की, “स्थायी वित्त समितीच्या प्रस्तावांसह (५०० कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या योजना) २०२०-२१ या आर्थिक वर्षात आधीच मंजूर किंवा अनुमोदीत केलेल्या नवीन योजनां स्थगित करण्यात आल्या आहेत.