सिव्हिल सेवा २०२० च्या परिक्षांची तारीख स्थगित

Last Modified गुरूवार, 21 मे 2020 (09:28 IST)
संघ लोक सेवा आयोग, युपीएससी (Union Public Service Commission, UPSC) च्या परिक्षांची तारीख स्थगित करण्यात आली आहे. ही परिक्षा ३१ मे रोजी घेण्यात येणार होती. या परिक्षांबाबतच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र ती काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर
२० मे रोजी युपीएससी सिव्हिल सेवा २०२० च्या परिक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव त्याची घोषणा होऊ शकली नाही. आयएएस प्रीलीअम्स आणि भारतीय वन सेवा प्रारंभिक परिक्षांची तारीख अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार असून स्पर्धकांना अधिक माहितीसाठी upsc.gov.in या साइटवर जाता येणार आहे.

संघ लोक सेवा आयोगाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात युपीएससी २०२० च्या परिक्षांचे वेळापत्रक पुन्हा कधी जाहिर करण्यात येईल, याचा उल्लेख केलेला नाही. यामध्ये केवळ २० मे रोजी परिक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा होणार नाही, इतकेच नमूद करण्यात आले आहे. परिस्थितीचा आढाव घेऊन पुढील तारीख जाहिर करू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांना बसणाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. युपीएससी परिक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) सह इतर भारतीय सेवांकरता अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्याच्या माध्यमातून ७९६ पदांची भरती होती. त्यापैरी २४ पद हे दिव्यांगांसाठी राखीव असतात.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून ला मतदान

राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून ला मतदान
राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. राज्यसभेच्या १८ जागांवर ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी ...