Last Modified सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (15:47 IST)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जळगावात देखील बैलांची मिरवणूक काढल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोळा हा शेतकर्यांचा सण म्हणून ओळखला जातो. या दरम्यान मोठी यात्रा आणि मेळा भरतो. मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
हा सण वैयक्तिरीत्या साजरा करता येईल. शेतकरी बांधवांनी घरीच बैलांची पूजा करुन सण साजरा करावा, गर्दी करु नये, सार्वजनिकरीत्या प्रसादाचे वाटप करु नये, असे आदेश देण्यात आले आहे.