1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (23:35 IST)

'या' वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिलं प्रत्युत्तर

Praveen Darekar
पुन्हा येईल, पुन्हा येईल हा विषय जुना झाला आहे. संजय राऊत यांच्याकडील विषय संपलेले दिसत आहेत. म्हणून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस निश्चितपणे या महाराष्ट्राच्या राजकारणात लोकनेते आहेत काल होते आज आहेत आणि उद्याही आहेत तसेच ते पुन्हा येतील असे प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 
 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना रिकामटेकडे असून त्यांच्याकडे खूप वेळ असे म्हटलं आहे. तसेच त्यांचं डोकंही खाली असल्याचा टोला लगावला आहे. यावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी बोलताना उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगले पाहिजे. पुपरस्थितीमध्ये संजय राऊत कुठे पाहणी दौरा करायला गेले का? पाण्यात उतरले का? केवळ मीडियासमोर वक्तव्य करणं हे वेगळं असतं, तौत्के वादळ आलं तेव्हाही पाहणी करण्यास गेलो होतो. यामुळे रिकाम टेकडे दौरा करतात की टीका करतात हे राज्यातील जनता पाहत आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.