सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (16:02 IST)

संजय राऊतांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी 'ही' प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान यावेळी त्यांनी या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत असं सांगत उद्धव ठाकरे त्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे.संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
रत्नागिरी,कोल्हापूर,सातारा,सांगली तसंच इतर जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शरद पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत जाहीर केली यावेळी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.दरम्यान शरद पवारांना संजय राऊतांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती इतक्या पुढे जात असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आनंदच आहे”.