मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 जुलै 2021 (11:43 IST)

काय सांगता! पुराच्या पाण्यातून वरात निघाली

What do you say! The bridegroom came out of the floodwaters Maharashtra news regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
सध्या अवघ्या महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढले आहे.सर्वत्र हाहाकार माजत आहे.अनेक गावी या महापुरात उध्वस्त झाली आहे.पूरग्रस्त भागात नागरिकांच्या मदतीसाठी सैन्य दल आणि NDRF पथके युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहे.अशा परिस्थिती काही लोक हटके काम करत आहे. असेच घडले सांगलीत. सांगली जिल्ह्याला देखील महापुराचा फटका बसला आहे.अनेक गावे उध्वस्त झाली आहे.तर या कठीण काळात एका तरुणाने चक्क स्वतःचे लग्न लावले.एवढेच नव्हे तर त्यांनी आपली वरात पुराच्या पाण्यात बोटीतून काढल्याचे वृत्त मिळाले आहे.सध्या या घटनेचे व्हिडीओ वायरल होत आहे.
 
सांगलीत सध्या घर बुडेल एवढे पाणी आहे.अशा परिस्थितीत नववधू घरी कशी आणावी अशा प्रश्न एका तरुणाला पडला.या वर तोडगा म्हणून त्याने एक बोट मागवून त्यात बसवून वरात काढत नववधूला घरात आणले.