शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (18:08 IST)

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मालिकांची उपस्थिती, भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप

ajit panwar
अजित पवार यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक उपस्थित होते. या नंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. 

राज्यात या वरून राजकारण सुरु आहे.अजित पवार यांनी त्यांच्या निवास स्थानी एक बैठक आयोजित केली असून या बैठकीत नवाब मालिकांची हजेरी लागली होती. आता या वरून राजकारण सुरु झाले असून या वर भाजप आणि शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार या प्रकरणी म्हणाले, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे त्यांना आपल्या सोबत आणू नका. तर त्यांना बोलावले होते की ते स्वतः उपस्थित होते अद्याप या बाबत अधिकृत माहिती नाही. या बाबत देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी कडून माहिती घेतील.

तर राष्ट्रवादीच्या नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या अजित पवारांनी या बाबत खुलासा करावा.या वर अजित पवारांना विचारल्यावर ते म्हणाले -आपल्याला काही त्रास आहे का ? आता या वर भाजप आणि शिवसेना काय करते ते पाहावे लागणार 
 
 Edited by - Priya Dixit