शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (18:59 IST)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

chandrashekhar bavankule
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ.प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे वयाच्या 74 व्या वर्षी आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती कृष्णराव, चार मुले, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. 

त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवास स्थान कोराडी येथून कोलार घाट येथे जाणार असून तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. 

बावनकुळे यांच्या आईच्या मृत्यू नंतर त्यांची उद्दिग्न भावना, माझे दैवत आज मला सोडून गेले.
गेली काही दिवस त्यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या आजारातून बाहेर येतील असे वाटत होते मात्र आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बावनकुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. 
 

Edited by - Priya Dixit