1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जून 2023 (09:43 IST)

राज्यातील या भागांत पावसाची हजेरी

rain
येत्या 3-4 दिवसांत महाराष्ट्र तसंच कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टिने परिस्थिती अनुकूल होत आहे.
 
मुंबईतही आज सकाळी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पण तो मान्सून पूर्व पाऊस असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात कोकणामध्ये मान्सून 11 जूनपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून तो तिथेच खोळंबलेला आहे. 
 
आधीच लांबलेला मान्सून आलेल्या चक्रीवादळामुळे आता पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता 23 जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आवश्यक आर्द्रता निर्माण झाली नाही. परिणामी महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश लांबला.
 
थोडक्यात, मान्सून अंदाजाप्रमाणे येणार होता, त्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळे काहीसा विलंब झाला, असं मुंबई हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितलं.
 
तसेच, जूनच्या तिसर्‍या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्या पुढील आठवड्यात सरासरी पाऊस पडेल, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 

त्यानंतर हवामान विभागाने 18 ते 21 जूनच्या दरम्यान मान्सूस महाराष्ट्र आणि मुंबईत सक्रीय होईल, असा अंदाज वर्तवला. पण आता मान्सूनचं आगमन पुन्हा एकदा लांबलं आहे.
 
दरम्यान, हवामान विभागाने आणि प्रादेशिक हवामान विभागाने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता . येत्या काळ्यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. 
 
एकंदरीत जून महिन्यात एकदा पावसाचा खंड झाला की संपूर्ण खरीप हंगामावर वाईट परिणाम होतो. मान्सून लांबल्याने शेतकर्‍याच्या नजरा मान्सूनच्या काळ्या ढगांगडे लागल्या आहेत. 
 





Edited By- Priya Dixit