सोमवार, 17 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (19:42 IST)

मासिकपाळी असल्यानं वृक्षरोपणासाठी रोखलं, अंधश्रद्धेचा पगडा कधी उठणार ?

Prevented
महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचा कळस पाहिला मिळतोय. नाशिकमध्ये अंधश्रद्धेची अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव इथं शासकीय कन्या आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मागील आठवड्यात वृक्षारोपणाचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने  या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पण या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखलं. कारण काय तर या मुलीला मासिक पाळी आली होती. तू झाड लावू नकोस, कारण झाड जगणार नाही, असं सांगत शिक्षकाने त्या मुलीला झाड लावू दिलं नाही. सर्व मुलींच्या समरो शिक्षकाने त्या मुलीला झाड लावण्यापासून रोखलं. 
 
शिक्षक बारावीच्या वर्गात शिकवतात. हा प्रकार अंधश्रध्दा खतपाणी घालण्याचा प्रकार असुन संबंधित शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केलीये