रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (08:34 IST)

पंतप्रधान मोदी असंवेदनशीलतची हद्द पार करत आहेत : पटोले

अर्थसंकल्पीय संसद अधिवेशन सुरू असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील विविध खासदारांची भाषणे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि सरकारच्या धोरणांबाबत भूमिका स्पष्ट केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतान नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदी असंवेदनशीलतची हद्द पार करत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. करोना जेव्हा सुरू झाला, जागतिक आरोग्य संघटनेने जी मार्गदर्शक तत्वे सूचवली, त्याचं पालन केलं असतं तर ही वेळ देशावर आली नसती. ही चूक अगोदर त्यांनी मान्य करावी. नमस्ते ट्रम्प कोणी केलं? तब्लिगी समजाला जागतिक पातळीवरचं अधिवेशन या देशात कोणी घ्यायला लावलं? या दोन गोष्टींचं उत्तर जनतेला त्यांनी द्यावं.”
 
तसेच, “किती वर्ष तुम्ही काँग्रेसला शिव्या देऊन सत्तेचा उपभोग घेऊन, देश विकणार आहात? याचंही उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी लॉकडाउन सुरू केला, त्या दिवशी रेल्वे बंद करून टाकली. बस, विमानसेवा बंद केली. त्यावेळी लोकाना भारत-पाकिस्तानचं विभाजन झालं आणि जो काही त्रास त्यावेळी भोगावा लागला, तीच परिस्थिती तुम्ही लॉकडाउन जाहीर केल्यानंतर झाली. रेल्वेखाली येऊन लोकांचा मृत्यू झाला. रस्त्यांवर लोकाचा मृत्यू झाला. 
 
याचबरोबर, “असंवेदनशील अशा व्यवस्थेला झाकण्यासाठी काँग्रेसवर आरोप करत आहेत. उलट त्यांनी काँग्रेसने तर माणुसकीचं नातं जोडलं हे सांगायला पाहिजे. आम्ही त्यावेळच्या सर्व लोकाना तपासून रेल्वेत बसवून, त्यांच्याजवळ पैसे नव्हते रोजीरोटी कमावण्यासाठी इथे लोक आली होती त्यांना तिकीट आम्ही काढून दिली. त्यांनी तर उलट शाबासकी द्यायला हवी होती, पण ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान कमी आणि भाजपाचे प्रचारक म्हणून सातत्याने वागत आहेत, याचा प्रत्यय आज त्यांनी दिला. ते पंतप्रधान नाहीत तर भाजपाचे प्रचारक म्हणून बोलतात, जनतेची कुठली काळजी नसलेला हा पंतप्रधान देशाने आज पाहीला आहे.” असंही नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.