शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (20:29 IST)

Prime Minister Modi पंतप्रधान मोदी साईचरणी लीन

Prime Minister Modi Saicharani Leen पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून  शिर्डी साईमंदिरात त्यांनी दर्शन घेतलं;. यावेळी पाद्यपूजेसह साईदर्शन घेत आरतीही संपन्न झाली. यावेळी पीएम मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीत पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस येऊ देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.
 
शिर्डीतील काकडी विमानतळाजवळील मैदानावर मोदी शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.
 
यावेळी मोदींचे भाषण ऐकण्यासाठी शिर्डी अहमदनगर आजूबाजूच्या गावातून हजारोच्या संख्येने लोक पोहोचली आहेत. कडेकोट बंदोबस्तात पोलीस प्रत्येकाला तपासूनच आत मध्ये सोडत आहेत. राज्यातील 14 हजार कोटी रुपयांची विविध प्रकल्पांचे, विकासकामांचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.