मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (15:19 IST)

पटोलेंची जीभ छाटणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस; भाजप नेत्याची उघड धमकी

‘मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. राज्यात आंदोलन करण्यात आले. आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. ‘नाना पटोलेंची जीभ छाटा १ लाख मिळवा’ अशी घोषणाच जालन्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जालना भाजप युमो चांगलीच आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी तर चक्क नाना पटोलेंची जीभ छाटून आणा आणि १ लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी घोषणा आहे. जोगस यांनी जालना पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार देखील दिली आहे.