बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जुलै 2019 (10:30 IST)

जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील ऑडियो बुकची निर्मिती

महेश गादेकर यांच्या संकल्पनेतून खासदार शरद पवार  यांच्यावरील ऑडियो बुकची निर्मिती झाली. नुकतंच दिनांक 29 जून रोजी आ. हेमंत टकले यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या ऑडियो बुकचं सोलापूर येथे विमोचन झालं. पवारसाहेबांचा संपूर्ण चरित्रपट ऑडियो बुकच्या माध्यमातून रेखाटण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. रुद्रेश व्हदलुरे यांनी या ऑडियो बुकचं लेखन केलं असून अनिरुद्ध जोशी यांनी या ऑडियो बुकचं अभिवाचन केलं आहे. शिवरंजनी ऑडियो व्हिज्युअल्स, सोलापूर यांनी याचं ध्वनिसंकलन केलं असून रामदास वाकचौरे यांनी सजावट केली आहे.
 
एकूण 114 मिनिटांच्या या ऑडियो बुकचे श्रोत्यांसाठी बारा छोटे भाग केले गेले असून हे ऑडियो बुक युट्युबवर उपलब्ध आहे. प्रस्तावना, काटेवाडी ते मंत्रालय, पुलोद सरकार, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा इतिहास, राष्ट्रहिताची सुवर्णजोड – लोंगोवाल करार, देशाचे संरक्षणमंत्री, सलाम मुंबई – सलाम शरद पवारजी, महिला धोरण – सावित्रीच्या लेकींचा उद्धार, मंडल आयोगाची अंमलबजावणी, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, राष्ट्रवादीची गुढी उभारताना, धरणीचा भगिरथ – कृषिमंत्री शरद पवार अशी ही ऑडियो प्रकरणं या बुकमध्ये आहेत.