1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जुलै 2019 (09:01 IST)

शरद पवार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट देणार

Sharad Pawar
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनास्थळाला खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या सोमवारी ८ जुलै रोजी भेट देणार आहेत. येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. तिवरे धरण फुटल्याने यामध्ये २३ जणांचा बळी गेला. धरण फुटीनंतर संबंधित अधिकारी व शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.
 
या दुर्घटनेनंतर शरद पवार सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत. पवार ७ जुलै ते ८ जुलैपर्यंत पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्हयाच्या दौर्‍यावर असून पुणे येथील साखर कारखान्याच्या सेमिनारला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.