गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 21 मे 2019 (12:17 IST)

एक्झिट पोल आणि मोदींचं केदारनाथ दर्शन म्हणजे नौटंकीः शरद पवार

Exit Polls
निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ-बद्रीनाथला गेले होते. केदारनाथमधील ध्यानमुद्रेतले त्यांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मोदींचं केदारनाथ दर्शन ही 'नौटंकी' असल्याचं म्हटलं होतं.
 
राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी मुंबईतील इस्लाम जिमखाना इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीदरम्यान शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.  
 
यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेले एक्झिट पोल हेदेखील एक प्रकारचं नाटकच असल्याचं म्हटलं.