सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (23:35 IST)

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा होणार

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र वीजपुरवठ्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे की, गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच अखंडीत वीजपुरवठा करण्यात येईल. जर काही बिघाड झाला तर तात्काळ वीज मंडळाचे कर्मचारी दुरुस्त करतील. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सवादरम्यान वीज पुरवठा घेत असतात या मंडळांना अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. 
 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी. गणेश मंडळांनी नुतणीकरणाचा अर्ज भरुन नोंदणी करावी. तसेच गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी सामाजिक मदतीचे उपक्रम राबवून समाजाच्या हिताचे काम करावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.