शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:05 IST)

8000 हजार रुपयाची लाच घेताना विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवीन तीन विज मीटरची जोडणी करुन एक ट्रान्सफर करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील प्रधान तंत्रज्ञ आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून अटक केली. 
 
प्रधान तंत्रज्ञ संदिप दशरथ भोसले (वय-38) आणि खासगी व्यक्ती हरी लिंबराज सुर्यवंशी (वय-22 रा. लोहगांव, पुणे) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.याबाबत एका 50 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
 
तक्रारदार यांनी तीन घरांचे बांधकाम केले आहे.यासाठी त्यांनी तीन वीज मिटर जोडणी करण्यासाठी आणि एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी महावितरण कंपनीच्या विश्रांतवाडी  शाखेत अर्ज केला होता.या कामासाठी संदीप भोसले याने तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपये लाच मागितली.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता संदिप भोसले याने लाच घेण्याचे मान्य केले.तसेच लाचाची रक्कम खासगी व्यक्ती हरी सुर्यवंशी याच्याकडे देण्यास सांगितली.त्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून संदिप भोसले याच्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्विकारताना सुर्यवंशी याला रंगेहाथ पकडले.दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.