सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (23:35 IST)

पुण्यात तरुणावर गोळीबार, आरोपीला अटक

पुण्यातील खडकमाळ येथील एका इमारतीमध्ये चोरी करणार्‍या आरोपीचा पाठलाग करणार्‍या तरुणावर गोळीबार झाला आहे. त्या आरोपीला पकडण्यात यश देखील आले आहे. विठ्ठल वामन बोळे असे आरोपीचे नाव आहे. तर आवेज सलीम अन्सारी (वय-23) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, खडकमाळ येथील एका सोसायटीत आवेज सलीम अन्सारी हे राहतात. ते दुपारी जेवण झाल्यावर टेरेसवर गेले होते. त्यानंतर त्यांना खाली येताना घराचा दरवाजा उघडा दिसला. तेवढ्यात जिन्यात अनोळखी व्यक्ती पळत जाताना दिसली. त्या व्यक्तीचा आवेज यांनी पाठलाग केला असता. 
 
आरोपींनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेत आवेज सलीम अन्सारी हे जखमी झाले आहे. तर त्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे.