शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (21:04 IST)

मोठी बातमी! चिंचवडमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, सहा जण ताब्यात

चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे वनविभागाच्या वतीने कारवाई करत एका महिलेसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मुहमदनईन मुटतअली चौधरी (वय 58), योगेश्वर सुधाकर साखरे (वय 25, रा. बालेवाडी), अनिल दिलीप कामठे (वय 45, रा. फुरसुंगी), जोतिबा गोविंद जाधव (वय 38), कृष्णात श्रीपती खोत (वय 59) आणि सुजाता तानाजी जाधव (वय 44) असे अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून व्हेल माशाची उलटी सदृष्य 3 किलो ग्रॅम पदार्थ आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.
 
पुणे वनविभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या वतीने याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून आरोपींना ताब्यात घेतले. वनजीवांची तस्करी व शिकार होत असल्यास हॅलो फॉरेस्टच्या 1926 या टोल फ्री क्रमांकार संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने कऱण्यात आले आहे.