सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (23:04 IST)

अटक केली नसून पोलिसांच्या विनंतीनुसार कोर्टात गेलो होतो : राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. परंतु अटक केली नसून पोलिसांच्या विनंतीनुसार कोर्टात गेलो होतो असा खुलासा स्वतः नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली यानंतर संगमेश्वर पोलीस स्थानकात नारायण राणेंना नेण्यात आलं होते. मी स्वतःच्या गाडीतून पोलीस स्टेशनला आणि कोर्टात गेलो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वक्तव्याची आठवणही करुन दिली आहे.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक आणि जामीन नंतर बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणे यांनी सांगितले की, मला अटक करण्यात आली नाही. पोलिसांच्या विनंतीनुसार स्वतःच्या गाडीने कोर्टात गेलो होतो. गाडीत बसल्यावर अटक झाली नव्हती. पोलिसांनी कोर्टात हजर करायचे आहे असं सांगण्यात आलं होते. कोर्टात जाईपर्यंत मला अटक करण्यात आली नव्हती असा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.