शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (12:06 IST)

पुण्याच्या बेकरीत आग, 6 जणांना मृत्यू

पुणे- शहरातील कोंढवा बुद्रुक क्षेत्रात शुक्रवारी पहाटे बेक्स अॅण्ड केक्स बेकरीत आग लागून त्यात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बेकरीला बाहेरून कुलूप लागले होते. त्यामुळे बेकरीच्या कामगार आतच अडकले. दुर्घटनेच्या वेळी कामगार आत झोपलेले होते.
 
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार उत्तर प्रदेशाचे रहिवासी आहे. मृतांची नावे इर्शाद खान (वय २६), शानू अन्सारी (वय २२), झाकीर अन्सारी (वय २४), फहिम अन्सारी (वय २४), जुनेद अन्सारी (वय २५), निशाण अन्सारी (वय २९) असे आहे.
 
आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्यांने आग विझवण्याचे काम केले असून कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. बेकरी मालकाविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले आहे.