शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (21:36 IST)

कोरोना प्रतिबंधक लस देण्याऐवजी दिली रेबीजचं इंजेक्शन

ठाण्यातील कळवा इथल्या आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला लसऐवजी रेबीजचं इंजेक्शन दिल्याचं उघड झालं आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं असून या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे.रेबीजचे इंजेक्शन दिलेल्या व्यक्तीला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 
 
हलगर्जीपणाची ठाण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधी ठाणे महापलिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर  लस घेण्यासाठी आलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस  देण्यात आले होते. एकाच वेळी तीन डोस दिल्याने महिला घाबरली आणि घरी निघून गेली. आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला हा संपूर्ण प्रकार सांगितला.