शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (08:18 IST)

खळबळजनक : खोट्या टीआरपीसाठी रॅकेट उघड, तीन चॅनेलचे नाव उघड

मुंबई पोलिसांनी खोट्या टीआरपीसाठी (TRP) रॅकेट उघड केले आहे. यात पैसे देऊन टिआरपी मिटरशी छेडछाड करण्यात येत होती. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी धक्कादायक माहिती दिली. याप्रकरणी दोन मराठी चॅनेलचे मालक ताब्यात घेण्यात आले आहेत. सोबतच खोट्या टीआरपीसाठी रिपब्लिक चॅनेलचे नाव पुढे आले आहे. काही चॅनेल बंद असताना सुरु ठेवण्यात आली. 
 
देशात २००० बॅरोमीटर लावण्यात आले आहे. बॅरोमीटर लावण्याचे आणि दुरुस्तीचे काम हंसा कंपनीकडे देण्यात आले होते. हंसा कंपनीचे माजी कर्मचारी बॅरोमीटर असणाऱ्या घरांची माहिती पुरवत असे हेच कर्मचारी लोकांना पैसे देऊन काही खास चॅनल लावायला सांगत होते, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
 
प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याच्या खात्यातून २० लाख रुपये मिळाले आहेत, तसेच ८ लाख रुपये जप्त केले आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बीएआरसीने दिलेल्या रिपोर्ट नुसार रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर, कर्मचारी यासगळ्यात अडकले असलण्याची शक्यता आहे.