1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (13:25 IST)

सिंधुदुर्ग किल्ल्यावर 5 रुपयांवरून महिलांमध्ये राडा

1 rupee coin
सिंधुदुर्ग किल्ल्यावर महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना सिंधुदुर्ग किल्यावर घडली आहे. सिंधुदुर्ग किल्यावर वायरी भूतनाथ ग्राम पंचायतच्या माध्यमातून पर्यटकांकडून 5 रुपये पर्यटन कर घेतले जाते. कर भरणार नाही असं म्हणत 40 महिला पर्यटकांनी दादागिरी करून किल्यावरील दोंन महिला कर्मचार्यांना मारहाण केली. त्यांनतर स्थानिक महिलांनी पर्यटनासाठी आलेल्या महिलांना देखील मारहाण केल्यामुळे राडा झाला. नंतर हा वाद मालवण पोलीस ठाण्यात गेला. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिला पर्यटकांनी स्थानिक महिलांची माफी मागितली आणि हा वाद मिटला. 
 
 
Edited By- Priya Dixit