1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (10:29 IST)

खानापूरचे नायब सुभेदार जयसिंग भगत सियाचीनमध्ये शहीद

Jawan Naib Subhedar Jai Singh Shankar Bhagat
खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांचे लेह लडाख विभागातील सियाचीनमध्ये निधन झाले. सियाचीनमध्ये बर्फवृष्टीमुळे ते झोपले असताना मेंदूत रक्तपुरवठा गोठून ते कोमात गेले. सकाळी त्यांच्या सहकार्यांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राण ज्योत मालवली.जयसिंग हे भारतीय सैन्यदलात 2003 पासून कर्तव्य बजावत होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, तीन बहिणी, भाऊ आणि वडील असा मोठा परिवार आहे.  त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी खानापूर येथे आणण्यात येतील शनिवारी  आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. 
 
Edited By- Priya Dixit