1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:30 IST)

मला तर वाटते या कार्यक्रमातील भाषणे ऐकूण मिठी नदीही हसली असेल, रोहित पवार यांचे ट्विट

rohit panwar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारच्या कामांचे कौतुकही केले. मात्र, त्यांनी केलेल्या या दौऱ्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार  यांनीदेखील ट्विट करत निशाणा साधला. ते म्हणाले की, "हा कार्यक्रम प्रकल्पांच्या लोकार्पणाचा होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता? हेच काळात नाही आहे." असे म्हणत त्यांनी टीका केली.
रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एका जुना फोटो शेअर करत ट्विट केले की, "काल मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम बघून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता, की एकमेकांचा कौतुक सोहळा होता? हेच कळत नाही. मला तर वाटते या कार्यक्रमातील भाषणे ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काहीकाळ गोड झाला असेल!”
 
Edited By- Ratnadeep Ranshoor