मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (22:18 IST)

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून माहिती दिली

Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द सिंधिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
 
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट केले की, मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी. 
ज्योतिरादित्य सिंधिया मंगळवारी भाजपच्या राज्य कोअर ग्रुपच्या बैठकीत सहभागी झाले होते, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव काही वेळानंतर अचानक बैठक सोडली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधियाला ताप येत असल्याचे सांगितले होते. मात्र, सभेतून ते निघून गेल्याच्या अनेक चर्चाही सुरू झाल्या होत्या. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यानेच ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
Edited by - Priya Dixit