सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:26 IST)

गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो सदिच्छाचे वडील

१४ महिन्यांपूर्वी मुंबईतील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी पालघरची सदिच्छा साने बेपत्ता झाली होती. त्यानंतर आज या प्रकारांत आरोपी असलेल्या मितू सिंहने तिची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचेही त्याने कबूल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वांद्रे बँड स्टँडजवळ समुद्रात सदिच्छा सेनेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात आरोपी मितू सिंहने आपला जबाब अनेकदा बदलला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक वाढत गेला. अखेर त्याने आपणच तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. आज सकाळपासून पोलिसांनी नौदलाच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु कलेची होती. मात्र, काहीही हाती न लागल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. मात्र, पुन्हा एकदा पोलीस दुसऱ्या यंत्रणांच्या साहाय्याने शोध घेणार असल्याचे सांगितले आहे.
 
सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी यावर म्हंटले आहे की, "सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत आहेत." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंहने माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor