संबंधित माहिती
- Cabbage pickle कोबी-मटराचं लोणचं
- Corn Cutlets मक्याचे कटलेट्स
- Christmas Party Food Ideas 2022: ख्रिसमस पार्टीच्या मेनू मध्ये या चविष्ट पदार्थांचा समावेश करा
- Sweet potato useful in diabetes : डायबिटीजमध्ये रताळे खूप उपयुक्त,आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या
- Skin Whitening Face Pack: बटाटा आणि तांदळाचा फेसपॅक लावा त्वचेवर चमक मिळवा
Khima Tikki बटाटा खिमा टिक्की
साहित्य : खिमा- 200 ग्रॅम, कांदा (बारीक चिरून) 1 चमचा, आलं-लसूण पेस्ट- 1 चमचा, लाल तिखट- 1 चमचा, गरम मसाला- 1 चमचा, मीठ- चवीप्रमाणे, लिंबू रस- 1 चमचा, बटाटे (उकडलेले)- 4, कॉर्न फ्लॉवर- 3 चमचे, तेल- तळण्यासाठी.
कृती : प्रथम उकडलेले बटाटे किसून त्यामध्ये मीठ, लाल तिखट व कॉर्न-फ्लॉवर घालून मळून घेणे. थोडे मीठ घालून खिमा शिजवून घ्यावा. त्यानंतर कढईत तेल गरम करून कांदा परतून घेणे. कांदा लालसर झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी. नंतर खिमा घालावा. लाल तिखट, गरम मसाला व कोथिंबीर घालून कोरडे होईपर्यंत परतवावे. कोरडा झाल्यावर खिमा गार होऊ द्यावा. त्यानंतर बटाटय़ाच्या लगद्याची छोटी वाटी तयार करून त्यामध्ये खिमा भरावा. घट्ट दाबून त्याला गोल व चपटय़ा अशा टिक्कीचा आकार द्यावा. फ्राइंग पॅनमध्ये मंद आचेवर सोनेरी रंग होईपर्यंत श्ॉलो फ्राय करावे. पुदिना, चटणी व ब्रेड बरोबर गरमागरम सव्र्ह करावे.
पुढील लेख
