मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Updated : बुधवार, 18 जानेवारी 2023 (15:08 IST)

Cabbage pickle कोबी-मटराचं लोणचं

cabbage-pickle
साहित्य : कोबी 500 ग्रॅम, मटर 250 ग्रॅम, सरसोची डाळ 1 मोठा चमचा, मोहरीची डाळ 1 मोठा चमचा, 1/2 हळद चमचा, 1 चमचा तिखट, मीठ 1 मोठा चमचा, 1/2 चमचा आमचूर पावडर, जाडसर वाटलेली शोप 1 चमचा, हिंग चिमटीभर, 2 मोठे चमचे तेल.
 
कृती : कोबीचे लहान लहान तुकडे करून मटरचे दाणे काढून घ्यावे. दोघांना 5 मिनिट उकळत्या पाण्यात टाकून 2 मिनिटाने काढून घ्यावे व एका सुती कापडावर 24 तासासाठी वाळत ठेवावे. तेल गरम करून त्यात पहिले हिंग व सर्व मसाले टाकावे. या तयार मसाल्यात वाळलेली कोबी आणि मटरचे दाणे टाकून एकजीव करावे. 2-3 दिवसानंतर या लोणच्याला पुरी किंवा परोठे सोबत खावयस द्यावे.