शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (10:32 IST)

दिवाळी स्पेशल माव्याची करंजी

karanji
साहित्य- मैदा, मैदा भिजव‍िण्यासाठी दूध, तळण्यासाठ‍ी साजूक तूप
 
आतले सारणाचे साह‍ित्य- खोबर्‍याचा क‍िस, पिठी साखर, मावा, काजू, किस‍मिस, बदाम, खसखस, चारोळ्या, इलायची पावडर, जायफळ पूड.
 
क‍ृती- मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या.
 
आतील सारणासाठी खोबर्‍याच्या किसात आवडीप्रमाणे पिठी साखर घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात काजू बदामाचे तुकडे करून टाका. खसखस, चारोळ्या, इलायची पूड, जायफळ पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भ‍िजविलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.