शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : रविवार, 22 जानेवारी 2023 (16:52 IST)

Corn Cutlets मक्याचे कटलेट्स

साहित्य : 5 मध्यम आकाराचे बटाटे,1वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तमच, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, साधारण २ पेराएवढा आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 ते 5 ब्रेड स्लाईस, 4 ते 5 चमचे रवा, मीठ, तेल. 
 
कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या. मक्याचे दाणे काढून तेही बटाट्यांबरोबर उकडा. चाळणीवर टाकून मक्यातले पाणी काढून टाका. बटाटेही चाळणीवर टाकून कोरडे होऊ द्या. साले काढून बारीक करून घ्या.   
 
पावाचे स्लाइस पाण्यातून काढा व पिळून घ्या. हा गोळा किसलेला बटाटा व मक्याच्या दाण्यात मिसळा. आले, लसूण, मिरची वाटून त्याची पेस्ट करा व ही पेस्ट वरील गोळ्यात मिसळा. मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पाहा. एका ताटलीत रवा घ्या. गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर शॅलोफ्राय करा.
 
गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किवा चिंचगूळ खजुराची चटणीसोबत सर्व्ह करा.