1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (13:54 IST)

Tasty Udid dal and spinach vade recipe :उडदाची डाळ आणि पालकाचे चविष्ट वडे रेसिपी

appe
लोकांना वडा खायला आवडतो.विशेषतः, जेव्हा हवामान थंड असते, तेव्हा आपल्या सर्वांना काहीतरी गरम किंवा चविष्ट खावेसे वाटते. हिवाळ्यात  हिरव्या पालेभाज्या देखील भरपूर प्रमाणात येतात.हिवाळा असल्याने आणि या ऋतूत हिरव्या पालेभाज्या खाणे खूप चांगले मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत वडा बनवताना त्यात पालकाचाही समावेश करू शकता.आपण मेदू वडे, बटाटा वडे खाललेच आहे. आज पालक आणि उडीद वडे कसे बनवायचे जाणून  घेऊ या .  
 
साहित्य-
 
- 1/4 कप उडीद डाळ 
- अर्धा पालक जुडी 
- एक मध्यम आकाराचा कांदा 
- 2 चमचे बेसन
- 2-3 हिरव्या मिरच्या 
- ठेचलेला लसूण 
- अर्धा चमचा कसुरी मेथी 
- 1 टीस्पून जिरे 
- 1/4 टीस्पून गरम मसाला 
- 1/2 टीस्पून सोडा 
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
 
कृती- 
सर्व प्रथम उडीद डाळ नीट धुवून घ्यावी. आता साधारण ४ तास पाण्यात भिजत ठेवा. आता भिजवलेली डाळ पुन्हा धुवून ग्राइंडरच्या भांड्यात टाका आणि त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता एका भांड्यात बारीक चिरलेला पालक ठेवा. तसेच त्यात कांदे आणि मिरच्या घालून मिक्स करा. आता त्यात उडीद डाळ, मीठ, कसुरी मेथी, लसूण, गरम मसाला, जिरे, सोडा आणि बेसन घालून नीट मिक्स करून घ्या.

आता कढईत तेल तापत ठेवा. माध्यम आंचेवर पिठाचे लहान  गोळे करून घ्या आणि गरम  तेलात  सोडा. वडे सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.वडे तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून घ्या. अशा प्रकारे उरलेल्या पिठाचे वडे तयार करून गरम वडे चटणी आणि सॉस सोबत सर्व्ह करा. 

Edited By - Priya Dixit