1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (15:00 IST)

Diwali Special Recipe : भाजक्या पोह्‍यांचा चिवडा

chivada
साहित्य : 1 किलो भाजके पोहे , पाव किलो शेंगदाणे, 200 ग्रॅम खोबर्‍याचे पातळ पातळ काप, 200 ग्रॅम डाळवा, 15 ते 20 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/2 किलो तेल, मीठ चवीनुसार, तिखट, धणे जिर्‍याची पूड, 2 चमचे पिठी साखर, कडूलिंबाची पाने आवडीप्रमाणे, फोडणीचे साहित्य. 
 
कृती- सर्वप्रथम भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. नंतर हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाडवा घालून परतून घ्या. त्यानंतर त्यात भाजके पोहे घाला. सर्वात नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परतून घ्या. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

Edited by : Smita Joshi