शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (17:28 IST)

दिवाळी विशेष रेसिपी : घरीच बनवा चविष्ट कलाकंद

दिवाळीच्या विशेष सणा निमित्त पण घरातच चविष्ट कलाकंद बनवून आपल्या घरातील सदस्य आणि इष्टमित्रांचे तोंड गोड करा. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य- 
पनीर 250 ग्राम, खवा किंवा मावा 250 ग्राम, क्रीम 1 /2 कप , दूध  1/2 कप  साखर  दीड कप, वेलची पूड 1/4 चमचा , साजूक तूप  दीड चमचा, पिस्ता बदाम बारीक काप केलेले 2 मोठे चमचे.
 
कृती- 
सर्वप्रथम पनीर आणि खवा किसणीने किसून मॅश करून मिसळून घ्या. या मिश्रणात दूध आणि क्रीम घाला. आता एका कढईत तूप घालून हे मिश्रण त्यात घालून मंद आचेवर परतून घ्या.  हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात साखर मिसळा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलचीपूड मिसळून गॅस बंद करा. आता हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या एका मोठ्या ताटलीत ओतून द्या आणि वडीला सुरीने चौरस आकार द्या. या वडीवर बारीक चिरलेले पिस्ता बदामाचे काप घाला चविष्ट कलाकंद तयार. नंतर या वड्या एका हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. आपण ही मिठाई आपल्या पाहुण्यांना आणि कुटुंबियांना सर्व्ह करा.