शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (13:09 IST)

शंकरपाळी क्रिस्पी बनवण्यासाठी काही खास टिपा

शंकरपाळी सर्वात लोकप्रिय नाश्ता आहे. शंकरपाळी कधीही कोणत्याही वेळेत तोंडात टाकणे आवडतं. मात्र घरी शंकरपाळी बनवताना अनेकदा प्रश्न पडतो की ते बाजारात मिळणार्‍या खस्ता कुरकुरीत शंकपार्‍यांसारखे कसे बनवायचे? चला, आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत-
 
टिपा-
शंकरपाळी बनवण्यासाठी, मैद्यामध्ये मोयन नक्की घाला, पण तेलाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त ठेवू नका.
 
खारे शंकरपाळी तयार करताना मैद्यामध्ये जिरे किंवा ओवा टाकल्याने त्याची चव वाढते. 
मीठाच्या प्रमाणाकडे लक्ष असावं. जास्त मीठ त्याची चव खराब करते.
 
पीठ मळून घेण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरावं. 
मैद्यामध्ये रवा मिसळल्याने कुरकुरीतपणा येतो. 
शंकरपाळी फक्त मंद आचेवर तळावे. अन्यथा ते वरून सोनेरी झाले तरी आतून कच्चे राहण्याची शक्यता असेल.
 
आपण इच्छित असल्यास बेकिंग पावडर देखील वापरू शकता. 
कसूरी मेथीमुळे चव आणखी चांगली होते.
 
 
शंकरपाळी बनविण्यासी कृती
-एक बॉउलमध्ये मैदा, तेल, मीठ आणि ओवा घालून मिसळून घ्या.
आता यात कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या आणि 20 मिनिटांसाठी तसंच राहू द्या.
आता याची मोठी-मोठी लोई तयार करा आणि पोलपाटावर जाड पराठ्‍यासारखं लाटून घ्या.
आता चाकूच्या मदतीने आपल्या आवडीच्या आकाराचे छोटे- छोटे तुकडे करा.
इतर पिठाचे देखील शंकरपाळी कापून घ्या.
आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर तळून घ्या.
गार झाल्यावर एयर टाइट कन्टेनरमध्ये भरुन ठेवून घ्या.
चहा-कॉफी सोबत सर्व्ह करा.