शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (16:16 IST)

दिवाळी फराळ : गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत गोड शंकर पाळे बनवा या पद्धतीने

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊनच टिपला आहे. आता सुरुवात होणार दररोज काही न काही गोड धोड करण्याची. लाडू, करंज्या, चकली, अनारसे, शेव, चिवडा, शंकर पाळे, मठरी आणि असे बरेच व्यंजन घर-घरात बनतात. याच शृंखलेत आज आम्ही आपणास चविष्ट आणि गोड शंकर पाळे बनविण्याची रेसिपी सांगत आहोत. हे लहानांपासून मोठ्यांना देखील आवडतात. आपण हे नक्की बनवा.
 
साहित्य -
1/4 कप साखर, 1/4 कप दूध, 2 चमचे तूप, 1 कप गव्हाचे पीठ, मीठ चिमूटभर, तूप तळण्यासाठी.
 
कृती - 
एका कढईत दूध, साखर आणि तूप घालावे. चांगले मिसळावे आणि मध्यम आचेवर जो पर्यंत साखर वितळत नाही तो पर्यंत ढवळावे वितळल्यावर ते थंड होण्यासाठी ठेवावे. 
 
आता गव्हाचे पीठ चाळणीने चाळून एका भांड्यात घ्या. त्यामध्ये मीठ घाला. थोडं थोडं करून दूध आणि साखरेचे थंड झालेले मिश्रण मिसळा आणि कणीक मळून घ्या. 
 
आता या कणकेचे थोडे थोडे भाग करून त्या गोळ्याला पोळी सारखे लाटून घ्या. आता त्या लाटलेल्या पोळी मध्ये सुरीने किंवा चिरण्याने विटेचा आकाराचे काप द्या. आता या कापलेल्या तुकड्यांना वेग वेगळे करून ठेवा.
आता कढईत तूप तापविण्यासाठी ठेवा. तूप तापल्यावर गरम तुपात ते काप टाका आणि तांबूस रंग येई पर्यंत मंद आचेवर तळून घ्या आणि तळलेले शंकरपाळे टिशू पेपर वर काढून घ्या. चविष्ट गोड शंकरपाळे तयार. थंड झाल्यावर एका बंद डब्यात भरुन ठेवा.