दिवाळी रेसिपी : मस्तानी बालुशाही, खमंग साटोऱ्या आणि मावा करंजी

diwali recipe, balushahi recipe
Last Updated: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:08 IST)
खमंग साटोऱ्या
साहित्य -
1/2 कप मैदा, 2 चमचे रवा, 1/2 कप तेल, 1/2 कप साजूक तूप, 1 कप पाणी, चिमूटभर वेलची पूड, 1 कप पिठी साखर, 1 कप किसलेले खोबरे.
कृती -
एका भांड्यात मैदा, रवा थोडसं मीठ घालून एकत्र करा. सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा. आता भांड्यात थोडं-थोडं पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. पिठाला सेट होण्यासाठी दोन ते तीन तास ठेवून द्यावे.

सारण तयार करण्याची कृती -
एका भांड्यात बारीक किसलेले सुके खोबरे, पिठी साखर, चिमूटभर वेलची पूड मिसळा. या मिश्रणात गरजेपुरते मीठ घाला. सारणाचे लहान-लहान लाडू वळून घ्या.

आता मळलेले पिठाला एक सारखे करून त्याचा लहान लहान गोळ्या बनवून पुरीचा आकार द्या. आता या पुरी मध्ये सारणाचे लाडू भरून मोदका सारखे भरून पोळी प्रमाणे लाटून घ्या. या लाटलेल्या पोळीला एका पॅन मध्ये थोडसं तूप घालून पोळी शेकून घ्या. दोन्ही कडून चांगल्या प्रकारे तांबूस रंग येई पर्यंत शेका. साटोरी तयार. आपण आवडीप्रमाणे शेकल्यावर साटोर्‍या तुपात तळू देखील शकतात. खुसखुशीत राहतात.

*********
मावा करंजी
साहित्य -
1 कप मैदा, 1 कप साजूक तूप, 1/2 कप रवा, 1 /4 ग्लास पाणी, 1 कप पिठी साखर, 1 कप भाजलेला खवा, 1 कप बारीक सुकलेलं खोबरं, बदाम आणि पिस्त्याचे काप, 1 चमचा चारोळ्या, केशर आणि चिमूटभर वेलची पूड.

कृती -
एका पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यावर त्यात अर्धाकप रवा भाजून घाला या मध्ये सुकं खोबरे, चारोळी, बदाम, पिस्त्याचे काप, वेलची पूड, केशर सर्व जिन्नस घाला. पॅन मधले सारण थंड झाल्यावर या मध्ये पिठी साखर, भाजलेला खवा मिसळा आणि सारण तयार करा.

एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये अर्धा कप तूप मिसळा या मध्ये थोडं थोडं करून कोमट पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. थोड्या वेळा साठी हे मळलेले पीठ ओलसर कपड्याने झाकून ठेवा.

मळलेलं पीठ एक सारखे करून लहान लहान गोळ्या बनवा आणि त्याचा लहान पुरी सारखे लाटून त्या पारी मध्ये सारण भरून त्याचे कडे दुधाचा हात लावून करंज्याच्या साच्या मध्ये ठेऊन करंज्या करा.

आता एका कढईत तूप टाकून गरम करण्यासाठी ठेवा आता या करंज्या तुपात टाकून तळून घ्या.
**********

मस्तानी बालुशाही
साहित्य -
2 कप मैदा, 2 कप साखर, 1 कप पाणी, 1/4 कप दही, 1/4 कप तेल, 1/4 कप साखरेच्या पाकासाठी पाणी, 1/4 कप साजूक तूप, चिमूटभर सोडा, बदामाचे काप, वेलची, गोड रंग

कृती -
एका भांड्यात पाणी आणि वितळलेले तूप, खायचा सोडा मिसळा, मैद्यात दही घालून मिसळून घ्या. पिठाला मळून घ्या आणि 20 मिनिटासाठी तसेच ठेवा.

पाक करण्यासाठी एका भांड्यात 2 कप साखर घाला, त्यात पाणी मिसळा आणि त्यात वेलची आणि गोड रंग घालून पाक तयार करा.

आता पिठाला नीट मळून घ्या. त्याचे लहान लहान गोळे बनवा आणि डोनटचा आकार द्या. आता हे गोळे गरम तेलामध्ये तळून घ्या. तयार बालूशाही साखरेच्या पाकात टाकून घ्या. मस्तानी बालूशाही खाण्यासाठी तयार.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

December 2021 Festival List:डिसेंबर महिन्यातील सण आणि व्रत

December 2021 Festival List:डिसेंबर महिन्यातील सण आणि व्रत
डिसेंबर २०२१ उत्सवांची यादी: डिसेंबर महिना उद्यापासून सुरू होणार आहे आणि हा महिना खूप खास ...

Masik Shivratri 2021: या दिवशी साजरी होणार मासिक शिवरात्री, ...

Masik Shivratri 2021: या दिवशी साजरी होणार मासिक शिवरात्री, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजा करण्याची विधि
मासिक शिवरात्री 2021: भगवान शिवाचा महिमा शास्त्र आणि पुराणात विशेष सांगितला आहे. असे ...

दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका ।

दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका ।
दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्‌गुरु माणिका । जय देव जय देव जयगुरु ...

गुरूचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी या प्रकारे संकल्प

गुरूचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी या प्रकारे संकल्प घ्यावा
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात ...

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, ...

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात
मंगळवारी रात्री तुपात सिंदूर मिसळून हा लेप हनुमानाला लावावा. पैशांची समस्या दूर ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...