बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (22:01 IST)

Delicious raw banana vade : कच्च्या केळीचे चविष्ट वडे, साहित्य आणि कृती जाणून घ्या

केळी हे असे फळ आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सामान्यत: लोकांना केळी हे फळ म्हणून खायला आवडते. कच्च्या केळीचे सामोसे , वडे देखील बनतात. कच्च्या केळीचे वडे बनवायची रेसिपी जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
सारणासाठी -
 4 कच्ची केळी, 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), 1 टीस्पून गरम मसाला पावडर
 3 टीस्पून साखर, 2 चमचे लिंबाचा रस,1 टीस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
चवीनुसार मीठ
 
फोडणी साठी साहित्य -
 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून उडीद डाळ, 1/2 टीस्पून जिरे 1 टीस्पून तेल
 4-6 कढीपत्ता.
 
पिठा साठी साहित्य -
1 टीस्पून बेसन,1 टीस्पून लाल तिखट ,1/4 टीस्पून हळद पावडर, चवीनुसार मीठ
 तळण्यासाठी तेल.
 
कृती -
सर्वप्रथम सारण तयार करा . यासाठी केळीला प्रेशर कुकरमध्ये सुमारे 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्या आणि थंड होऊ द्या. आता साल काढा आणि एका भांड्यात उकडलेले केळे मॅश करा.त्यात  हिरवी मिरची, साखर, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि गरम मसाला पावडर घाला. सर्व साहित्य खूप चांगले मिसळा. 
आता फोडणीची तयारी करा. कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ,मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की त्यात जिरे आणि कढीपत्ता घाला. तयार फोडणी सारणा मध्ये घाला आणि चांगले मिसळा.
 
आता पिठात लागणारे सर्व साहित्य मिक्स करून पाणी घालून बॅटर बनवा. सारणाच्या मिश्रणाचे साधारण 12 समान गोळे करून बाजूला ठेवा. तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर,गोळे पिठात बुडवा आणि काळजीपूर्वक तळण्यासाठी तेलात सोडा. वडे सर्व बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. गरमागरम केळीचे वडे  हिरवी चटणी, खजूर आणि चिंचेची चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.

Edited by - Priya dixit