Pumpkin Chips Recipe :लाल भोपळ्याच्या मदतीने बनवा खुसखुशीत चिप्स, रेसिपी जाणून घ्या
Pumpkin Chips Recipe : भोपळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.काहींना भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. लहान मुले भोपळ्याचे नाव ऐकल्यावर दूर पळतात.भोपळ्याचे चिप्स बनवून मुलांना खायला द्या ते आवडीने खातील. रेसिपी जाणून घ्या. भोपळ्याच्या कुरकुरीत चिप्स कशा तयार करायच्या साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य-
1/2 किलो भोपळा
1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल
अर्धा ते एक चमचे मीठ
1/2 टीस्पून दालचिनी
अर्धा टीस्पून जायफळ
कृती -
सर्व प्रथम भोपळ्याचे लहान तुकडे करा.
आता त्यावर थोडे तेल फवारून 400°F वर 15-18 मिनिटे एअर फ्राय करा.
आता ते एअर फ्रायरमधून काढा आणि भोपळा थोडा थंड होऊ द्या. साल काढून घ्या.
आता तुकडे परत एअर फ्रायर बास्केटमध्ये ठेवा. 8 मिनिटांसाठी 375°F वर एअर फ्राय करण्यासाठी सेट करा.
अधून मधून टॉस करा
आता एअर फ्रायरमधून चिप्स काढा आणि मीठ आणि इतर मसाले घालून मिसळा.
ओव्हन मध्ये भोपळा चिप्स कसे बनवायचे -
ओव्हनमध्ये भोपळ्याच्या चिप्स तयार करण्यासाठी, ते 400°F वर गरम करा आणि पार्चमेंट पेपरने बेकिंग शीट लावा.
भोपळ्याचे चौकोनी तुकडे करा आणि बिया काढून टाका.
आता भोपळ्याचे तुकडे ऑलिव्ह ऑइलमध्ये टॉस करून पार्चमेंट पेपरवर ठेवा.
सुमारे 30-40 मिनिटे शेकून घ्या.
ओव्हनमधून काढा. भोपळा किंचित थंड होऊ द्या.साल काढून घ्या.
आता मोठ्या भोपळ्याचे छोटे तुकडे करून एका मोठ्या भांड्यात ठेवा.
त्यात ऑलिव्ह ऑइल, मीठ, जायफळ आणि दालचिनी टाकून टॉस करा .
बेकिंग शीटवर ठेवा आणि सुमारे 10 मिनिटे.कुरकुरीत होईपर्यंत बेक करा,
अधून मधून पालटून घ्या. कुरकुरीत भोपळा चिप्स खाण्यासाठी तयार.
Edited By - Priya Dixit