शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (18:31 IST)

Diwali Recipe पातळ पोह्यांचा चिवडा

thin chivada
साहित्य - 4 कप पातळ पोहे, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 10 ते 12 कढी पत्त्याचे पाने, 1 /4 कप शेंगदाणे, 1 /4  भाजकी चणाडाळ, 1/4 खोबऱ्याचे काप, 2 चमचे काजूचे काप, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा पिठी साखर, मीठ चवी प्रमाणे.
 
कृती -
सर्वप्रथम कढई तेल तापत ठेवा आणि त्यामध्ये पातळ पोहे टाकून मध्यम आचेवर सतत ढवळत 2 ते 3 मिनिटे खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. पोहे बाजूला काढून ठेवा. 
 
आता कढईत तेल घालून त्यात मोहऱ्या आणि कढीपत्ता घाला. फोडणी फुटल्यावर त्यामध्ये शेंगदाणे, भाजकी चणाडाळ, खोबऱ्याचे काप आणि काजू घाला. मध्यम आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. नंतर हळद - तिखट घालून हे जिन्नस पोह्यांवर घाला. त्यावर मीठ व पिठीसाखर घालून एकत्र करुन घ्यावे. पातळ पोह्याचा चिवडा खाण्यासाठी तयार. हा चिवडा हवाबंद डब्यात ठेवा.

Edited by : Smita Joshi