खमंग उपवासाचे मेदु -वडे
साहित्य : 1 वाटी भगर, 1 वाटी पाणी, मीठ चवीप्रमाणे, किसलेलं आलं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, 2 उकडून किसलेले बटाटे, शेंगदाण्याचं तेल किंवा तूप (तळण्यासाठी).
कृती : सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये मीठ घाला. चांगली उकळी आल्यावर त्यात भगर घाला. झाकण लावून 8 ते 10 मिनिटे मंद आंचेवर चांगली शिजवून घ्या. आता गॅस बंद करा आणि तसंच पडू द्या. भगर थंड झाल्यावर एका ताटात काढून त्यामध्ये किसलेले बटाटे, मीठ, जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं घालून चांगले मळून घ्या. गोल वडे थापून तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या. खमंग आणि खुसखुशीत असे हे उपवासाचे मेदु वडे तयार.
हिरव्या चटणी आणि दाण्याच्या कुटाची आमटी सोबत सर्व्ह करावं.