रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2024 (09:05 IST)

खा. राहुल गांधी यांनी घेतले ञ्यंबकराजाचे दर्शन

rahul gandhi
भारत जोडो न्याय यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यात आलेले खा.राहुल गांधी यांनी आज सायंकाळी ञ्यंबकराजाचे दर्शन घेतले आणि अभिषेक पूजा केली.
 
त्यानंतर ते पुढील नियोजित यात्रेसाठी मोखाडा येथे रवाना झाले. यावेळेस त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब थोरात, जेष्ठ नेते राजराम पानगव्हाणे पाटील, आमदार हिरामण खोसकर, माजी जि.प.उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती .
 
मंदिरात त्यांचे पुजा पौरोहित्य विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, ललीत लोहगावकर आदींनी केले. दरम्यान विश्वस्त मंडळाचे चेअरमन न्या.नितीन जीवने, विश्वस्त कैलास घुले, पुरूषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, रूपाली भुतडा यांनी त्यांचे स्वागत केले. मंदिराचे संबंधात माहिती दिली. मनोज थेटे हे गांधी यांचे वंश परंपरागत तीर्थ पुरोहित आहेत त्यांनी राहुल गांधी यांना वंशावळ दाखवली.

Edited By - Ratnadeep Ranshoor