भुसावळमार्गे अहमदाबादकडे धावणारी विशेष ट्रेन सुरु
दहावी, बारावी परीक्षेनंतर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून विविध मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जात आहे, याच दरम्यान, उन्हाळी काळात रेल्वे प्रशासन कोईम्बतूर- भगत की कोठी दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी भुसावळ धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
०६१८१ कोईम्बतूर – भगत की कोठी गाडी आज म्हणजेच १४ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक गुरुवारी कोईम्बतूर येथून पहाटे २.३० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी भगत की कोठी येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. ०६१८२ भगत की कोठी – कोईम्बतूर विशेष गाडी १७ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत प्रत्येक रविवारी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुपारी २ वाजून ४५ पोहोचेल. तर जळगाव स्थानकावर ही गाडी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटाने पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा
काचीगुडा, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे थांबा आहे.
कोच रचना: 4- एसी थ्री टायर कोच, 7- एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच, 1- स्लीपर क्लास कोच, 4- जनरल सेकंड क्लास कोच, 1- सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन फ्रेंडली) आणि 1- लगेज कम ब्रेक व्हॅस
Edited By - Ratnadeep Ranshoor