शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2024 (12:31 IST)

'या' योजने अंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांना मिळणार 25 हजार रुपये!

शुभमंगल सामूहिक विवाह योजने अंतर्गत लग्न करणाऱ्या जोडप्यांना राज्य सरकार 25000 रुपयांचे अनुदान देणार आहे. असा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अध्यक्ष स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या योजनेअंतर्गत जोडप्यांना 10000  रुपये अनुदान देण्यात येत आहे. तर आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान तर राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2500 रुपये अनुदान देणार आहे. या पूर्वी संस्थांना 2000 रुपयांचा अनुदान मिळायचा. हा अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल. 

महिला व बाल विकास विभागामार्फत सामूहिक विवाह योजना राबविली जाते. या योजनेअंर्तगत शेतमजूर, शेतकरी, निराधार, परित्यक्ता, विधवा महिलांच्या दोन मुलींच्या विवाह केले जाते. या योजनेत आता पर्यंत जोडप्यांना 10 हजार रुपये दिले जात होते. आता महागाईचा विचार करून राज्य सरकारने अनुदानात वाढ करत 25000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit