नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, की संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे आणि त्याचा फटका हा सरकारला बसेल, असा आतापर्यंत नागरिकांचा कल असल्याचे समोर येत आहे. ...