1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (08:39 IST)

राज्याच्या कृषीमंत्र्यांना अभ्यास करण्याची गरज,संतोष सोमवंशी यांची टीका

औसा : सोयाबीनच्या उत्पादनात राज्यात पहिल्या असणा-या लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचा दर देशात ठरविण्यात येतो, असे असतानाही राज्य सरकारने लातूरातील सोयाबीन संशोधन केंद्र परळीला हलविण्यात आले. शेतक-यांंवर सरकारने केलेला अन्याय आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांना अभ्यास करण्याची गरज आहे, अशी टीका राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली.
 
शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सोयाबीन संशोधन केंद्राबाबत सरकारच्या निर्णयाचे निषेध करत औशातील आडत बाजारपेठ बंद ठेवन्यात आली. यानिमित्त आयोजित निषेध आंदोलनात ते बोलत होते. औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आक्रमक शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी देत आक्रोश व्यक्त केला. यावेळी संपूर्ण आडत बाजार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.यात शेतकरी, व्यापारी, मापाड्यांनी सहभाग नोंदवून बंदला प्रतिसाद दिला.
 
Edited By - Ratnadeep ranshoor