1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विद्यार्थ्याला वर्गात लॉक करून गेले शिक्षक, तो तासनतास रडत राहीला

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक एका निरागस मुलाला शाळेच्या वर्गात कोंडून स्वतः घरी गेले. त्यानंतर मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक जमा झाले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. त्यांनी ग्रामस्थांसह शाळेला घेराव घालून घोषणाबाजी केली.
 
हे प्रकरण दौसा येथील रामसिंगपुरा येथील महात्मा गांधी सरकारी शाळेशी संबंधित आहे, जिथे सुट्टीच्या काळात शिक्षकाने इयत्ता 2 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला घाईघाईने वर्गात बंद केले आणि स्वतः घरी गेले. अनेक तास उलटूनही विद्यार्थी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला.
 
 
दरम्यान शाळेच्या खोलीत कोणाचा तरी रडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीयांनी तेथे धाव घेतली असता त्यांना बालक भीतीने रडत असल्याचे दिसल्याचे तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांनी संपूर्ण माहिती शाळा प्रशासन आणि पोलिसांना दिली. 
 
शाळेतील कर्मचार्‍यांना पुन्हा शाळेत बोलवण्यात आले तेव्हा सुमारे 3 तासानंतर मुलाला वर्गातून बाहेर काढण्यात आले. या घटनेकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.